महाराष्ट्र २४ ऑनलाईन – । संभाजीनगर । विशेष प्रतिनिधी ।संभाजीनगर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. रोज नव्याने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागात व संपूर्ण शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी आणखी १४ जणांना कोरोना झाला आहे. शहरातील बाधितांचा आकडा १४४ वर गेला आहे.
भीमनगर येथील ६, किलेअर्क १, आसिफिया कॉलनी २, नूर कॉलनी १, कैलास नगर १, चिखलठाणा १, सावरकर नगर १ जिल्हा रुग्णालय, जीएमसीएचमध्ये ऍडमिट अशा १४ जणांचा समावेश असल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.