महाराष्ट्र २४ ऑनलाईन – । पुणे । विशेष प्रतिनिधी । ओमप्रकाश भांगे ।पुण्यात काल रात्रीपर्यंत रुग्णसंख्या १५९५ एवढी होती. त्यात आणखी १२७ रुग्णांची भर पडल्याने हा आकडा १७२२वर पोहोचली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे . पुण्यात काल रात्री ९ वाजल्यापासून ते आज पहाटे ९ वाजेपर्यंत म्हणजे अवघ्या १२ तासांत १२७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण रुग्णसंख्या १७२२वर पोहोचली आहे.
रात्री ९ नंतर काही तासांतच ८७ तर मध्यरात्री ४० असे १२७ रुग्ण वाढले. यातील बरेचसे रुग्ण झोपडपट्टी भागातील असल्याचं सांगण्यात येतं. या रुग्णांची ट्रव्हेलिंग हिस्ट्री नसून संपर्कामुळे त्यांना करोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येतं. हे १२७ रुग्ण कुणाकुणाच्या संपर्कात आले होते, याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच या रुग्णांच्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांना होम क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. पुणे हे करोनाचं हॉटस्पॉट ठरल्याने पुण्यातील अनेक भाग सील करण्यात आले आहेत. तसेच झोपडपट्टीतील लोकांना शाळा, महाविद्यालयांमध्ये संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तरीही पुण्यातील रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.