महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ सप्टेंबर । पुणेकरांसाठी (Pune) महत्वाची बातमी आहे. येत्या १ ऑक्टोबर रोजी शहरातील CNG पंप बंद राहणार आहेत. पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणात वाहने सीएनजीवरील आहेत. त्यामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूकीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. (Pune News Today)
पेट्रोलियम मंत्र्यालयाने याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार CNG च्या ट्रेड डीलर मार्जिनमध्ये वाढ व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे १ ऑक्टोबर रोजी पुणेकरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. (Pune Todays News)
सद्यस्थितीला पुणे शहरात 60 पेक्षा जास्त सीएनजी पंप आहेत. पुण्यात CNG वर मोठ्या प्रमाणात वाहने चालतात. काही दिवसांपूर्वी महापालिकेने सीएनजीवरील पीएमपीएलच्या बसही आणलेल्या आहेत. अशातच पुणे शहरातील सीएनजीचे पंप एक दिवस बंद राहणार असल्याने याचा मोठा फटका बसू शकतो.