पुढील 2 दिवस उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि . २२ सप्टेंबर । राजस्थान आणि गुजरातच्या उत्तर-पश्चिम काेपऱ्यातून बाहेर पडणारा मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला आहे. भारत माेसम विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार परतीचा मान्सून दसऱ्याला म्हणजे ५ ऑक्टाेबरपर्यंत खान्देशातून दक्षिणेकडे मार्गक्रमण करेल. १, ३ ऑक्टाेबरपर्यंत मान्सून सातपुडा ओलांडून खान्देशात प्रवेश करेल. दसऱ्याला पुढील दाेन दिवस संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात जाेरदार पावसाचा अंदाज आहे.

सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात देशातून मान्सूनच्या माघारीचा प्रवास सुरू झाला आहे. राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून मान्सून वारे परत फिरले आहेत. त्यामुळे राज्यात जाेरदार पाऊस हाेत आहे. उत्तर महाराष्ट्रात २४ ते २७ सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी जाेरदार पाऊस हाेणार आहे. २२ सप्टेंबर राेजी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

अवकाळी पावसाची मालिका : मान्सून परतीच्या नंतरही डिसेंबरपर्यंत राज्यात अवकाळी पावसाची अधूनमधून हजेरी राहणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात मान्सून राज्याबाहेर जाईल. त्यानंतर अवकाळी, वादळी पाऊस काेसळेल. शेतीसाठी हा पाऊस नुकसानकारक ठरण्याची दाट शक्यता आहे.

आठवड्यात जाेर ओसरणार
परतीचा मान्सून खान्देशातून ५ ऑक्टाेबरपासून परत जाणार असला तरी २८ सप्टेंबरपासून पावसाचा जाेर काहीसा कमी हाेणार आहे. नवरात्राेत्सवात सुरूवातीचे दाेन दिवस पावसाचे असतील. नंतर ४ ऑक्टाेबरपर्यंत पावसाचा जाेर आेसरलेला असेल. ५ ते ७ ऑक्टाेबर राेजी उत्तर महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जाेर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.

अशी असेल स्थिती : २०-२१ सप्टेंबरला गुजरात,राजस्थानातून बाहेर पडणारा मान्सून ३० सप्टेंबरपर्यंत गुजरातच्या दक्षिण भागात पाेहाेचेल.मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून परतीचा प्रवास सुरू हाेईल. ३ ऑक्टाेबरपासून उत्तर महाराष्ट्रात प्रवेश करताना पूर्व उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून बाहेर पडेल.१० ऑक्टाेबरला मान्सून पश्चिम महाराष्ट्रातून दक्षिणेच्या प्रवासाला निघेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *