दूध-दह्याचे पुन्हा दर वाढणार ? ही कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ सप्टेंबर । एकीकडे महागाई वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दरही सणासुदीच्या तोंडावर वाढत आहेत. आधीच दुधाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामध्ये पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईमुळे दूध आणि दह्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

डेअर प्रोडक्ट विकणाऱ्या मदर डेअरी कंपनीने दुग्ध उत्पादनाच्या किंमती वाढण्याचा विचार केला आहे. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तसे संकेत दिले आहेत.

सध्याच्या आर्थिक वर्षात मदर डेअरीमधील प्रोडक्टवर २० टक्के किंमत वाढण्याची शक्यता आहे. यामागचं कारण देखील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मदर डेअरीचा टर्नओव्हर १५ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. याशिवाय मदर डेअर फळं आणि भाज्यांच्या क्षेत्रातही उतरलं आहे. त्यामुळे तिथल्या किंमतींवर याचा काय परिणाम होणार ते पाहावं लागेल.

नुकतेच दूध-दह्याचे दर वाढवण्यात आले होते. डिझेलचे दर वाढल्याने दुधाचे दरही वाढल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. दरवाढीत शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचा दावा कंपनीने केला. मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बंदलिश विक्री वाढीबद्दल सांगतात की, चालू आर्थिक वर्षात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत 15 टक्क्यांहून अधिक वाढ होत आहे.

याचा फायदा मदर डेअरीला झाला. मदर डेअरीचा 70 टक्के व्यवसाय फक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आहे. यावर्षी आईस्क्रीमची विक्रीही बंपर होण्याची अपेक्षा आहे कारण त्याचा व्यवसाय कोरोनामुळे ठप्प झाला होता. तर मदर डेअरीतील उत्पादनाच्या किंमती किती रुपयांनी वाढणार आणि त्या लागू कधीपासून होणार याची धाकधूक ग्राहकांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *