तब्बल इतक्या वर्षांपूर्वीचा खजिना जगासमोर, पाहा कसं दिसतं अस्सल सोनं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि . २३ सप्टेंबर । मानवी आयुष्यात काही हजार वर्षांपूर्वीच्या काळात डोकावून पाहिल्यास असे संदर्भ मिळतात, ज्यावर विश्वासही ठेवणं अशक्य. अशीच एक अविश्वसनीय गोष्ट अमेरिकेतील पेरू या देशातून समोर आली आहे. जिथं पुरातत्वं विभागाच्या एका टीमला देशाच्या राजधानीच्या सीमेपासूनच काही अंतरावर असणाऱ्या हुअर्मे टाउनजवळ वारी साम्राज्याचा एक अतिप्राचीन मकबरा सापडला आहे. जिथं सात मानवी शरीराचे अवशेष सापडले आहे. सध्या उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार इसवीसन 500 ते 1000 दरम्यान वारी साम्राज्य अस्तित्वात होतं. (Big Discovery archaeologists pure gold silver treasures in peru)

दरम्यान, उत्खननातून मिळालेल्या अवशेषांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि तीन तारुण्यावस्थेतील व्यक्तींचे अवशेष दिसत आहेत. जमिनीखाली कित्येक वर्षे दडललेल्या या गोष्टी समोर आल्या आणि पाहणारेही हैराण झाले.

काही हजार वर्षांपूर्वी शुद्ध सोनं- चांदी (pure gold silver treasures ) कसं होतं ते उत्खननात समोर आलेल्या गोष्टी पाहून लक्षात येत आहे. सोन्या- चांदीचे दागिने, तांब्याची हत्यारं, सुऱ्या- कुऱ्हाडी, कपडे, लाकडाचे साहित्य, चामड्यापासून तयार करण्यात आलेल्या अनेक वस्तू यावेळी जगासमोर आल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *