महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ सप्टेंबर । Sara Ali Khan Viral Video: बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच चर्चेत पहायला मिळते,पण यावेळी ती चर्चेत आहे ते काही फार चांगल्या गोष्टीमुळे नाही बरं का. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला पाहिल्यानंतर लोक भलतेच भडकले आहेत. सारानं दारुच्या नशेत धुंद होऊन एका सिक्युरिटी गार्डला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला आसा आरोप तिच्यावर केला जात आहे. आणि सोबत ज्या पुरुषांची काहीच चूक नसते अशांच्या सुरक्षेच्या प्रश्न उठवला गेला आहे.(Video of Sara Ali Khan supposedly touching a security guard goes viral)
या व्हिडीओत सारा अली खान एका मैत्रिणी सोबत दिसत आहे. तिनं तिचा हात हातात धरलेला आहे. ती मुंबईच्या एका रेस्टॉरंटमध्ये शिरताना दिसत आहे. त्यांना पाहिल्यानंतर सिक्युरिटी गार्ड बाजूच्या भिंतीला एकदम चिटकून उभा राहतो,म्हणजे साराला तिथून रेस्टॉरंटमध्ये जायला काही अडचण येऊ नये. साराचे पाय तेव्हा थोडे लटपटतानाच दिसत आहेत. हे सगळं पाहिल्यावर लोकांचे म्हणणे पडतेय की सारा मद्यधुंद अवस्थेत दिसली,तसंच त्या सिक्युरिटी गार्डला एकदम चिटकून मुद्दामहून तिथून गेली आणि इतकंच नाही तर जाताना सिक्युरिटी गार्डला चुकीचा स्पर्श देखील केला तिनं.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोक खूपच भडकले आहेत. आणि साराच्या या चुकीच्या हरकतीवर प्रश्न देखील निर्माण करताना दिसले आहेत. ते ज्यांची काहीच चूक नाही अशा पुरुषांच्या बाजूनं उभे राहत त्यांच्या सुरक्षेवरनं प्रश्न निर्माण करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की जे साराने त्याच्यासोबत केले हे जर सिक्युरिटी गार्ड कडून चुकूनही झाले असते तर केवढा मोठा राडा घालण्यात आला असता,कदाचित त्या बिचाऱ्याची नोकरीही गेली असती. पण जर हेच चुकीचं कृत्य त्याच्यासोबत घडलं आहे तर मग त्याला पण न्याय मिळाला पाहिजे.