आता एक डॉलरसाठी 81 रुपये मोजा ; रुपया आणखी घसरला,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ सप्टेंबर । डॉलरच्या तुलनेत रूपयाचे अवमुल्यन सुरूच असून, शुक्रवारी सर्वकालीन निचांकी पातळी गाठली आहे. एका डॉलरसाठी तब्बल 81 रुपये मोजण्याची वेळ आली. रुपयाची ऐतिहासिक पडझड रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, रुपयाचे असेच अवमुल्यन सुरू राहिल्यास महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

गुरुवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 80.86 वर बंद झाला होता. ही पडझड सुरूच राहिली. शुक्रवारी सकाळी रुपया तब्बल 25 पैशांनी घसरला. एका डॉलरसाठी तब्बल 81 रुपये 22 पैसे मोजण्याची वेळ आली. रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करावा अशी मागणी गुंतवणुकदार आणि उद्योग क्षेत्राकडून केली गेली. मात्र, यामुळे पडझडीत फार सुधारणा झाली नाही. डॉलरच्या तुलनेत रुपया 80.99 रुपयांवर बंद झाला. एका डॉलरसाठी सुमारे 81 रुपये मोजण्याची वेळ आली. त्यामुळे गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला.

काय आहेत कारणे?

रशिया–युव्रेन युद्धामुळे वाढलेल्या तणावाच्या स्थितीत गुंतवणुकदार जोखीम घेण्यास पुढे येते नाहीत. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढविले आहेत. डॉलर 20 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. अशा विविध कारणांमुळे रुपयाची घसरण सुरू आहे.

महागाई वाढणार; जनतेला फटका

शुक्रवारी रुपयाने आजवरची निचांकी पातळी गाठली. मात्र, ही पडझड अशीच सुरू राहण्याचा अंदाज आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू राहिल्यास सर्वसामान्य जनतेच्या खिशावर थेट परिणाम होतो. हिंदुस्थानात आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढतील. प्रामुख्याने तेलासाठी जास्त चलन खर्च होईल. परिणामी पेट्रोल, डिझेलची दरवाढ होऊ शकते.

मुंबई शेअर बाजारात शुक्रवार हा ‘ब्लॅक फ्रायडे’ ठरला. सेन्सेक्स 1020 अंकांनी घसरला. यामुळे गुंतवणुकदारांना तब्बल 4 लाख कोटी रुपयांना फटका बसल्याचा अंदाज आहे.

बाजार उघडताच सेन्सेक्सची पडझड सुरू झाली. अखेर सेन्सेक्स 1020 अंकापर्यंत कोसळून 58098 अंकांवर बंद झाला. निफ्टीचा अंक 302 ने कोसळून 17327 अंकांवर बंद झाला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *