साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 25 ते शनिवार 01 ; जाणून घ्या आठवडा कोणत्या राशीला कसा असेल.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ सप्टेंबर ।

मेष: योजना आखताना काळजी घ्या

बुध, शुक्र युती, मंगळ, शनि त्रिकोणयोग. गोड बोलून तुमच्या मनातील गुपित काढून घेण्याचा प्रयत्न होईल. भावना व कर्तव्य यांचा मेळ घालणे कठीण होईल. नोकरीधंद्यात तारतम्य बाळगा. सामाजिक क्षेत्रात डावपेच टाकताना काळजी घ्या. दौऱयात सावध रहा. स्पर्धा अवघड आहे.
शुभ दिनांक: 28, 29

 

वृषभ: स्पर्धेवर लक्ष द्या

सूर्य, गुरू प्रतियुती, चंद्र, बुध लाभयोग. महत्त्वाची कामे करा. नोकरीत प्रगतीकारक संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार मिळेल. योजना रेंगाळत ठेऊ नका. कुटुंबातील कामे करून घ्या. खरेदी-विक्रीत लाभ. स्पर्धेत अग्रेसर राहाल. कला, क्रिडा, क्षेत्रात प्रेरणादायी वातावरण राहील.

शुभ दिनांक: 26, 27

 

मिथुन: प्रसंगावधान ठेवा

बुध, शुक्र युती, सूर्य, चंद्र लाभयोग. कोणत्याही क्षेत्रातील निर्णय घेताना उतावळेपणा नको. राग वाढवणाऱया घटना घडतील. नोकरीत नम्रता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रसंगावधान ठेवा. इतरांवर आरोप करताना सावध रहा. गोत्यात याल. कुटुंबात खर्च वाढेल. स्पर्धेत सतर्क रहा.

शुभ दिनांक: 28, 29

 

कर्क: यश संपादन कराल

मंगळ, शनि त्रिकोणयोग, सूर्य, चंद्र लाभयोग. धाडसी निर्णय घेऊन यश संपादन कराल. नोकरीधंद्यात सुधारणा करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे वर्चस्व वाढवतील. पदाधिकार मिळेल. लोकसंग्रह वाढवण्यात यश मिळेल. कुटुंबातील तणाव मिटून योग्य निर्णय घ्याल.

शुभ दिनांक: 26, 27

 

सिंह: कार्याला पुढे नेणारा काळ

बुध, शुक्र युती, मंगळ, शनि त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस तुमच्या कार्याला पुढे नेणारा आहे. श्री जगदंब कृपेने दिलासा देणारी घटना घडेल. प्रकृती सुधारेल. नोकरी, धंद्यातील अडचणी कमी होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तणाव कमी होईल. तुमच्या योजनांना प्रतिसाद मिळेल. प्रगती होईल.

शुभ दिनांक: 26, 27

 

कन्या: खंबीरपणे निर्णय घ्या

बुध, शुक्र युती, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. तुमच्यावर आलेले संकट वेगाने दूर सारून प्रगतीपथावर वाटचाल कराल. श्री जंगदबेच्या कृपेने सर्व कामांना गती मिळेल. कोर्टकेसमध्ये दिलासा मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात खंबीरपणे निर्णय घेऊन विजयी व्हाल. आर्थिक कांडी दूर होईल.

शुभ दिनांक: 27, 30

 

तूळ: सहनशीलता, नम्रता वापरा

चंद्र, मंगळ प्रतियुती, चंद्र, बुध पेंद्रयोग. प्रत्येक ठिकाणी प्रसंगावधान, सहनशीलता, नम्रता वापरा. श्री अंबेच्या कृपेने कठीण प्रसंगावर मात करण्याचे बळ येईल. क्षेत्र कोणतेही असो कठीण प्रसगांवर मात करावी लागेल. धंद्यात रागावर ताबा ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनस्ताप होईल. दौऱयात सावध रहा.

शुभ दिनांक: 30, 1

 

वृश्चिक: मान, प्रतिष्ठा, लोकप्रियता लाभेल

सूर्य, चंद्र लाभयोग, मंगळ शनि त्रिकोणयोग. रागावर ताब ठेवल्यास कठीण प्रश्न सोडवण्याचा मार्ग मिळेल. नोकरीधंद्यात प्रगती होईल. कर्ज मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांचा सामना करून पुढे जाल. मान, प्रतिष्ठा, लोकप्रियता लाभेल. खरेदी, विक्रीत लाभ होईल.

शुभ दिनांक: 26, 30

 

धनु: जिद्दीने तुमची कामे करून घ्या

बुध, शुक्र युती, सूर्य, चंद्र लाभयोग. साडेसाती माणसाला अनेक प्रसंगातून वाटचाल करायला लावते. नोकरीधंद्यात वर्चस्व राहील. विरोधकांना कमी लेखू नका. अहंकार नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात समस्यांचा गुंता सोडवाल. जिद्दीने तुमची कामे करून घ्या. आर्थिक साहाय्य मिळेल.

शुभ दिनांक: 26, 27

 

मकर: ध्येय गाठा.

सूर्य, चंद्र लाभयोग, शुक्र, गुरू प्रतियुती. नवरात्र उत्सवात तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रेरणादायक घटना घडतील. विरोध मोडून काढा. नोकरी, धंद्यात जम बसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात एकाग्र मनाने कार्य करा. ध्येय गाठा. प्रत्येक संधीचे सोने करा. तुमच्याकडे सर्वजण आशेने पाहात आहेत हे विसरू नका.

शुभ दिनांक: 26, 30

 

कुंभ: महत्त्वाच्या निर्णयाची घाई नको.

चंद्र, गुरू त्रिकोणयोग, चंद्र, मंगळ प्रतियुती. अतिशयोक्तीपूर्ण भाषण त्रासदायक ठरेल. प्रकृतीची काळजी घ्या. तणाव राहील. नोकरीत काम वाढेल. धंद्यात फसगत टाळा. प्रवासात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक त्रास देतील. प्रतिष्ठा जपा. महत्त्वाच्या निर्णयाची घाई नको. कामे वाढतील.

शुभ दिनांक: 30, 1

 

मीन: रेंगाळलेली कामे होतील

बुध, शुक्र युती, सूर्य, चंद्र लाभयोग. रेंगाळलेली कामे होतील. प्रेरणादायक घटना तुमचा उत्साह वाढवतील. नोकरीधंद्यात प्रगती कराल. नविन परिचय फायद्याचा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पदाधिकार मिळेल. श्री जगदंबेच्या कृपेने कठीण कामे होतील. कामात दिलासा मिळेल.

शुभ दिनांक: 26, 30

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *