महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ सप्टेंबर । सत्तास्थापनेनंतर अडीच महिन्यांनी शिंदे सरकारने शनिवारी 18 मंत्र्यांकडे 36 जिल्ह्यांचे पालकत्व बहाल केले. पालकमंत्री हा जिल्ह्याच्या विकासाचा कणा असतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर असते. पालकमंत्री नेमल्याने आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याची शक्यता आहे.
औरंगाबादच्या पालकमंत्रिपदी पैठणच्या संदिपान भुमरे यांची नियुक्ती करण्यात आली, तर अतुल सावे यांच्याकडे बीड आणि जालन्याची जबाबदारी देण्यात आली. अब्दुल सत्तार यांच्याकडे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील 6 जिल्ह्याची जबाबदारी स्वत: कडे घेतली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 40 दिवसानंतर मार्गी लागला होता. त्यानंतर खातेवाटपही 15 दिवस लांबले होते.
शिंदे गट व भाजपमध्ये मलईदार खात्यावरून रस्सीखेच सुरू होती. 45 दिवसानंतर पालकमंत्री जाहीर झाले. औरंगाबाद जिल्ह्याचे 1195 मध्ये चंद्रकांत खैरे हे पालकमंत्री हाेते. आता 23 वर्षानंतर भुमरे यांच्या रुपाने जिल्ह्यातील दुसरा पालकमंत्री मिळाला आहे.
औरंगाबादच्या पालकमंत्रिपदी संदिपान भुमरेंची नियुक्ती
देवेंद्र फडणवीस : नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली नियोजन मंत्रिपदही
राधाकृष्ण विखे पाटील : अहमदनगर, सोलापूर
सुधीर मुनगंटीवार : चंद्रपूर, गोंदिया
चंद्रकांत पाटील : पुणे
विजयकुमार गावित : नंदुरबार
गिरीश महाजन : धुळे,लातूर, नांदेड
गुलाबराव पाटील : बुलडाणा, जळगाव
दादा भुसे : नाशिक
संजय राठोड : यवतमाळ, वाशिम
सुरेश खाडे : सांगली
संदिपान भुमरे : औरंगाबाद
उदय सामंत : रत्नागिरी, रायगड
तानाजी सावंत : परभणी, उस्मानाबाद
रवींद्र चव्हाण : पालघर, सिंधुदुर्ग
अब्दुल सत्तार : हिंगोली
दीपक केसरकर : मुंबई शहर, कोल्हापूर
अतुल सावे : जालना, बीड
शंभूराज देसाई : सातारा, ठाणे
मंगलप्रभात लोढा : मुंबई उपनगर