महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ सप्टेंबर । भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. मालिकेतील दुसरा सामना नागपुरात झाला होता. पावसाने व्यत्यय आणलेला हा सामना केवळ 8-8 षटकांचा झाला. ज्यात टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला. रोहित शर्माने या मॅचमध्ये कमी ओव्हर्समुळे एक बॉलर कमी खेळवून ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं होतं. हैदराबादमध्ये रोहित पुन्हा एकदा 5 गोलंदाजांसह मैदानात उतरेल.
नागपूर टी-20 मध्ये भारताने जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल या चार गोलंदाजांसह मैदानात उतरले होती. त्याचवेळी हार्दिक पांड्या संघात अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावत आहे. निर्णायक सामन्यात रोहित शर्माला धोका पत्करायचा नाही. हार्दिक पांड्यासह एकूण 6 गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. जर तो अतिरिक्त गोलंदाज खेळला तर ऋषभ पंत संघाबाहेर जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा कोणाला संधी देणार ?
भारतासमोर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहरच्या रूपात दोन पर्याय आहेत. उमेश यादव देखील भारतीय संघाचा एक भाग असला तरी तो टी-20 विश्वचषक संघात नाही. त्यामुळे रोहित भुवी किंवा चहरला संधी देण्याचा विचार करेल. दीपक चहर राखीव खेळाडू म्हणून टी-20 विश्वचषक खेळणार आहे. भुवनेश्वर कुमारला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात संधी देण्यात आली होती. अशा परिस्थितीत दीपक चहरला विश्वचषकापूर्वी सरावाची संधी मिळावी, अशी रोहितची इच्छा आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार/दीपक चहर, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल