120 विद्यार्थ्यांना गुराढोरांसारखं टेम्पोमध्ये कोंबल, विद्यार्थी पडले बेशुद्ध

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ सप्टेंबर । गोंदियामध्ये धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका आश्रमशाळेतील 120 विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी दुसरीकडे घेऊन जाताना अक्षरश: एका टेम्पोत कोंबले. टेम्पोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं कोंबल्याने मुले घुसमटली आणि बेशुद्ध पडली. त्यांना उपचारासाठी एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार साठी आण्यात आले असुन त्यांच्या वर उपचार सुरु असुन त्यातील एका मुलीला गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी शाळा मजितपूर येथील 120 आदिवासी मुलं मुली खेळण्यासाठी तिरोडा तालुका येथील कोयलारी या आश्रम शाळेत जात होते. तिथे जाण्यासाठी टेम्पो करण्यात आला होता. या टेम्पोत 120 मुलांना अक्षरशा कोंबले होते. मात्र तिथून परतानाही तिच अवस्था होती. कोंबल्यामुळे मुलं घुसमटली आणि काही मुलं-मुली टेंपो मध्येच बेशुद्ध पडली. त्यांना एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आण्यात आले असुन त्यातील एका मुलीला गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

गोंदिया तालुक्यातील मजीदपूर येथील शासकीय आश्रम शाळा येथील 120 मुलं शनिवारी कोयलारी येथील आदिवासी आश्रम शाळा खेळासाठी गेले होते. त्यावेळी 120 मुला- मुलींना एका टेम्पोमध्ये कोंबून नेण्यात आले होते. तर त्या सर्व मुलांनी कोयलारी येथील आश्रम शाळेत जेवण केले. मात्र ते जेवण निष्कृष्ट दर्जाचे होते. त्या जेवणामध्ये अळ्या निघाल्याचेही विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितले होते. असा आरोप मजीतपूर येथील शासकीय आश्रम शाळेचे क्रीडा शिक्षक नरेंद्र लील्हरे यांनी केलेला आहे.

आम्ही सगळे विद्यार्थी तिरोडा तालुका येथील कोयलारी शासकीय आश्रम शाळेत खेळण्याकरिता गेलो होतो. दरम्यान साधारण 10 च्या सुमारास आम्हाला नाश्ता देण्यात आला. त्यानंतर दुपारी तीन वाजता जेवण देण्यात आले आणि सायंकाळी परतत असताना टेम्पोमध्ये आठ ते दहा मुला मुलींची प्रकृती अचानक बिघडली. तर टेंपो हा एकोडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले तिथून 3 मुलींना गोंदिया येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आल्याचे विद्यार्थी नितु पूषाम हिने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *