महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ सप्टेंबर । पिंपरी । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेची दर रविवारची साप्ताहिक पुजा युवा बांधकाम व्यावसायिक श्री अनिलशेठ दन्ने पाटील यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून संपन्न झाली विशेष म्हणजे आज श्री अनिलशेठ यांचा वाढदिवस होता श्री दिपक भोजने यांनी त्यांच्या बद्दल महिती दिली श्री अनिल धन्ने यांनी आपल्या मनोगतात मला पुजेचा मान दिल्याबद्दल श्री दिपक भोजने व समाज बांधवांचे आभार मानले व मी दर रविवारच्या साप्ताहिक पुजेस येत जाईल व समाजिक कार्यात योगदान देईल.
भोसरीचे आमदार व भाजपाचे शहर अध्यक्ष श्री महेशदादा लांडगे यांच्या मातोश्रीचे काल रात्री दुःखद निधन झाले दर रविवारची साप्ताहिक पुजा व सकल धनगर समाज बांधव पि.चि.शहर तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली व त्यानंतर अनिल दन्ने यांचा मल्हार आर्मी युवक आघाडी शहर अध्यक्ष श्री विजय महानवर व दादासाहेब खरात यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मल्हार आर्मी शहरअध्यक्ष दिपक भोजने , निलेश वाघमोडे , सचिन महानवर , शंकर दातीर , अतुल रकटे वैभव शिंदे , विशाल हरणावळ , अमोल म्हेत्रे , राजेंद्र पाटील , निलेश करपे व इतर समाज बांधव उपस्थित होते.