स्टार क्रिकेटपटू वर बलात्काराचा आरोप; आरोपी फरार, पोलिसांनी घेतली इंटरपोल मदत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ सप्टेंबर । संपूर्ण क्रिकेट विश्वाची शरमेने मान खाली एक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका क्रिकेटपटूवर आरोप ठेवण्यात आला असून संबंधित खेळाडूविरुद्ध अटक वॉरंट देखील जारी करण्यात आला आहे.

नेपाळचा स्टार क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय संघाचा कर्णधार संदीप लामिछान याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट देखील जारी करण्यात आला आहे. मात्र संदीप देशात परतला नाही. तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आणि त्याचे लोकेशन देखील अद्याप कळालेले नाही.

दरम्यान संदीपने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत स्वत:ला निर्दोष असल्याचे म्हटले आहे. नेपाळ पोलिसांनी या प्रकरणी संदीपला अटक करण्याच्या दृष्टीने इंटरपोलची मदत घेतली आहे. इंटरपोलने संदीपच्या विरोधात डिफ्यूजन नोटीस बजावली आहे.

संदीप लामिछान हा नेपाळमधील फक्त स्टार क्रिकेटपटू नाही तर तो संघाचा कर्णधार देखील आहे. बलात्काराचा आरोपानंतर नेपाळ क्रिकेट संघाने ८ सप्टेंबर रोजी एक आदेश देत त्याला निलंबित केले. संदीपवर काठमांडू येथील एका १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना एका हॉटेलमध्ये झाल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणी कोर्टाने संदीपविरोधात अटक वॉरंट देखील जारी केले होते. पण संदीप अद्याप देशात परतलेला नाही. संदीप वेस्ट इंडिज येथील कॅरेबियन प्रीमिअर लीग खेळत होता. तेथून तो रवाना देखील झाला, पण सध्या तो कुठे आहे हे अद्याप कळालेले नाही.

२२ वर्षीय संदीपने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगितले आहे. माझ्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. ज्यामुळे मी मानसिकरित्या कंटाळलो आहे. मला कळत नाही की काय करू. मी सध्या आजारी आहे आणि माझी प्रकृती सुधारण्याची वाट पाहत आहे. माझ्याविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपाविरुद्ध लढण्यासाठी मी तयार असून लवकरच देशात येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *