Crime : पुणे ‘सुकांता’ थाळी दोघांना पडली तब्बल 5 लाखांना ; वाचा काय घडलं

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ सप्टेंबर । पुण्यातील प्रसिद्ध असलेली सुकांता थाळी सर्वांनाच माहिती आहे. येथील थाळीचा आनंद घेण्यासाठी अनेकजण येथे गर्दी करत असतात. मात्र, याच चविष्ट अशा थाळीचा आनंद घेणे दोन नागरिकांना चांगलच महागात पडलं आहे. सुकांता थाळी पार्सल सेवा देतो सांगत सायबर चोरट्यांनी पुण्यातील दोघांना ५ लाखांचा गंडा घातला आहे. या संदर्भात येरवडा पोलीस ठाणे आणि कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या घटनेची शहरभर जोरदार चर्चा सुरू असून, पोलीस या भामट्यांचा शोध घेत आहेत.

येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद आचारी (४४, येरवडा) यांनी सुकांता थाळीची जाहिरात पाहून दिलेल्या नंबरवर फोन केला. थाळी घरपोच मिळेल त्यासाठी एक ॲप डाऊनलोड करा आणि त्यावर क्रेडिट कार्डची माहिती भरा असे सांगण्यात आले. आचारी यांनी कार्डचा नंबर टाकला आणि त्यांच्या बँकेतून ३.४० लाख रुपये काढण्यात आले. असाच प्रकार कोरेगाव पार्क भागात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील खंडेलवाल (३९) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. खंडेलवाल यांच्या पत्नीने या थाळीची जाहिरात सोशल मीडियावर पाहिली होती. त्यानुसार त्यांनीदेखील दिलेल्या नंबरवर फोन केला असता त्यांनादेखील प डाऊनलोड करून कार्डची माहिती भरण्यास सांगण्यात आले. त्यांनीदेखील कार्डची माहिती टाकली असात त्यांच्या खात्यातून १.५२ लाख रुपये गायब करण्यात आले. या घटनेमुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली असून, नेमके हे सायबर चोरटे कोण आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *