भुजबळांच्या वादग्रस्त विधानावर फडणवीस म्हणाले…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ सप्टेंबर । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या सरस्वती शारदे देवीवर केलेल्या विधानावर वातावरण चांगलंच तापलं आहे. शाळेत महापुरूषांचे फोटो लावले पाहिजे, त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात ? असे विधान भुजबळ यांनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. छगन भुजबळ यांच्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शाळेतील सरस्वती देवीचे फोटो हे सरकार काढणार नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी फडणवीसांनी छगन भुजबळांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘असे जर कुणी म्हणत असेल तर हे चुकीचे आहे. सरस्वती देवीचे फोटो हे सरकार काढणार नाही. तुम्हाला महापुरुषांचे फोटो लावायचे असतील तर लावा, त्याला हरकत नाही. छगन भुजबळ काय बोलले हे मी ऐकलेले नाही’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *