शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बॅनरवर कुणाकुणाचे फोटो असणार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ सप्टेंबर । दसरा मेळावा (Dussehra Melava Row) जस जसा जवळ येऊ लागला आहे, तस तशी दसरा मेळाव्यासाठीच्या तयारीलाही वेग येऊ लागला आहे.शिंदे गटाकडून बीकेसीवर (BKC) दसरा मेळावा घेण्यात येणार आहे. या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जय्यत तयारी करण्यास सुरुवात झालीय. दरम्यान, दसरा मेळाव्याच्या दिवशी शिंदे गटाच्या बॅनरवर कुणाकुणाचे फोटे असणार आहे, हे देखील आता ठरलंय. शिंदे गटाच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), आनंद दिघे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो असणार आहे, अशी माहिती समोर आलीय.

2 ते 3 लाख कार्यकर्त्यांची गर्दी जमवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यभरातून बसेसचं बुकिंगही करण्यात आलं असल्याची माहिती समोर आलीय. नवी मुंबईतून शिंदे गट कार्यकर्त्यांकडून 16 बस बुक करण्यात आल्या आहेत. शिवसेना का फुटली, का दोन भाग झाले, याची उत्तर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मिळतील, असं बंडखोर नेते रामदास कदम यांनी म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *