देशातील निम्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडायचीय ; फक्त एकच कारण , जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ सप्टेंबर । देशातील निम्मे कर्मचारी कामाच्या अतिरिक्त तासांमुळे नोकरी सोडू इच्छितात. एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे. कामाच्या तासांमध्ये वाढ झाल्यानं देशातील ५० टक्के कर्मचारी दुसऱ्या नोकरीच्या शोधात आहेत. करोना संकटकाळात अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम सुरू झालं. याचे परिणाम आता अतिशय स्पष्टपणे दिसून येत आहेत.

यूजरटेस्टिंगच्या अहवालानुसार, कामाचे अतिरिक्त तास आणि त्यामुळे येणारा ताण यामुळे ५० टक्के कर्मचारी त्रस्त आहेत. याच कारणामुळे त्यांना राजीनामा द्यायचा आहे. तर २० टक्के कर्मचाऱ्यांना काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल राखणं कठीण जात आहे. तर १५ टक्के कर्मचारी कामात तोचतोचपणा आल्यानं कंटाळले आहेत. एकसुरीपणामुळे ते त्रस्त आहेत.

वर्क फ्रॉम होममुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढली. घरातून काम करत असल्यानं प्रवासाचे कष्ट आणि वेळ वाचला. मात्र आता वर्क फ्रॉम होमचे इतर परिणाम जाणवू लागले आहेत. घरातून काम करावं लागत असलेले कर्मचारी अधिक तास कार्यरत राहत आहेत. कार्यालयीन कामं, मीटिंग्समध्ये त्यांचा अधिक वेळ खर्ची पडू लागला आहेत.

करोना संकटकाळापासून कामाचे तास वाढल्याचं ५५ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितलं. तर आपण वर्क फ्रॉम होम आणि वर्क फ्रॉम ऑफिस यांची सांगड घातल्याचं ८० टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितलं. तर १० टक्के जणांनी आपण ऑफिसमधूनच काम करत असल्याची माहिती दिली. ऑफिस आणि घरातून काम करत असल्यानं काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल राखणं सोप जात असल्याचं ५५ टक्के जणांनी सांगितलं. हायब्रीड मॉडेलमुळे कामातून मिळणारं समाधान वाढल्याचं मत ७० टक्के कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *