Vodafone-Idea ग्राहकांसाठी ; मोबाईलमधून नेटवर्क होणार गायब ? जाणून घ्या काय आहे कारण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० सप्टेंबर । गेल्या काही वर्षांपासून फायद्यातील व्यवसायासाठी झगडत असलेली व्होडाफोन आयडिया (vodafone idea) कंपनी 25.5 कोटी ग्राहकांच्या अडचणी वाढविण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरपासून कंपनीचे नेटवर्क (mobile network) बंद होऊ शकते. व्हीआयवर इंडस टॉवर्सचे जवळपास 7000 कोटींचे कर्ज थकीत आहे. जर कंपनीने तातडीने हे पैसे भरले नाहीत, तर व्हीआयला (VI network) नोव्हेंबरपासून टॉवर्सचा अॅक्सेस देण्यात येणार नाही, असा इशारा इंडसने दिला आहे. असे झाले तर ग्राहकांना नेटवर्क मिळणार नाही. (vodafone idea crisis vi network may closed from november)

मिळालेल्या माहितीनुसार टॉवर कंपनी इंडस टॉवर्सकडून व्होडाफोन-आयडियाला याबाबत चेतावणी देणारे पत्र पाठवण्यात आले आहे. इंडस टॉवर्सच्या संचालक मंडळाची सोमवारी बैठक पार पडली. त्यात कंपनीच्या आर्थिक स्थितीचा समावेश होता. यादरम्यान असे समजले की व्होडाफोन आयडियाकडे इंडस टॉवर्सचे सुमारे 7,000 कोटी रुपये आहेत.

Vi ची 5G ची सेवा मिळेल?

व्होडाफोन आयडिया ही टेलिकॉम कंपनी देशातील तीन नंबरची टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेलसोबतच व्होडाफोन आयडियाला २५.५ कोटी ग्राहक आहेत. रिलायन्स जिओ आणि एअरटेलने फाईव्ह जी सेवा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. व्होडाफोन-आयडियानेही घोषणा केली आहे. मात्र, त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता 5G साठी टॉवर उभे करण्याकरता कंपनीकडे पैसे नाहीत. त्यामुळे 5G ची सेवा मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *