GPay पेमेंट करताना या ट्रिक वापरून पाहा ; मिळवू शकता Cashback !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० सप्टेंबर । देशात गेल्या काही वर्षात डिजिटल पेमेंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. दुकानं, भाजी मार्केट, सार्वजनिक वाहतूक सेवा आणि इतर ठिकाणी डिजिटल पेमेंटचा वापर होत आहे. यामध्ये सर्वात सोपं असं गुगल पे (Google Pay) म्हणजे Gpay वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. काही वर्षांपूर्वी जीपेवर एखादं पेमेंट केलं की कॅशबॅक मिळत होतं. आता ठरावीक व्यवहारांवर तुटपुंजी कॅशबॅक (Gpay Cashback) किंवा कुपन मिळतं. पण आजही तुम्ही काही ट्रिक्स वापरून कॅशबॅक मिळवू शकता.

गुगल पेमेंट अ‍ॅपवर, तुम्हाला अनेक योजना पाहायला मिळतात ज्यामध्ये तुम्ही विशिष्ट पेमेंट केल्यास तुम्हाला कॅशबॅक मिळेल. या पेमेंटमध्ये गॅस बिल, वीज बिल आणि पेट्रोल बिल यांचा समावेश आहे. जर तुम्ही हे पेमेंट केली तर तुम्हाला एक विशिष्ट कॅशबॅक मिळेल.

जर तुम्ही एकाच खात्यावर मोठी रक्कम पाठवली आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला मोठा कॅशबॅक मिळेल, तर तसं होत नाही. जर तुम्हाला कॅशबॅक हवा असेल तर वेगळ्या खात्यावर पैसे द्या. त्यामुळे जास्त कॅशबॅक मिळेल आणि त्याची शक्यताही खूप जास्त असेल.

जर तुम्ही एकाच वेळी खूप मोठी रक्कम हस्तांतरित करत असाल, तर तुम्हाला त्या रकमेसाठी Google Payments वर जास्त कॅशबॅक मिळणार नाही. पण हीच रक्कम तुम्ही वेगवेगळ्या खात्यांवर ट्रान्सफर केल्यास, तुम्हाला जास्त कॅशबॅक मिळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *