आता असं एडिट करता येणार ट्वीट, पाहा खास फीचर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० सप्टेंबर । ट्वीटरवर एडिटचा ऑप्शन असावा ही मागणी गेली अनेक वर्षं केली जात होती. त्यानंतर ट्विटरने काही दिवसांपूर्वी एडिटचा ऑप्शन देणार असल्याची घोषणा केली होती. आता ती मागणी पूर्ण करत ट्विटरने पहिलं एडिटेड ट्विट प्रसिद्ध केलं आहे.

Twitter Blue हँडलवरून 30 सप्टेंबर वा टेस्ट म्हणून ट्विट केलं त्यात लिहिलं की, “एडिट बटण काम करतं की नाही, याची खात्री करण्यासाठी ही एक टेस्ट आहे, ते कसं काम करेल ते आम्ही तुम्हाला कळवू.”

सर्वात महत्त्वाचं म्हणजे एडिट बटणाची सुविधा सर्वांत आधी ‘ट्विटर ब्लू’ श्रेणीतील युजर्सना वापरता येणार आहे, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. या पूर्वी या महिन्यात, ट्विटरने जगभरातील निवडक ‘ट्विटर ब्लू’ युजर्ससह या फीचरची चाचणी सुरू केली होती आणि एडिट केलेलं ट्विट कसं दिसेल, हेही त्यांनी दाखवलं होतं.

पहिल्या एडिटेड ट्विटच्या खाली एक पेन्सिलसारखं चिन्ह दिसत आहे, जे ट्विट शेवटचं केव्हा एडिट केलं होतं, त्याचा टाइम स्टॅम्प दर्शवतं. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, जेव्हा तुम्ही ‘लास्ट एडिटेड’ लेबलवर क्लिक करता, तेव्हा तिथं तुम्हाला त्या ट्विटचा इतिहास दिसतो. ज्यामध्ये तुम्ही ते मूळ ट्विट आणि त्यात वेळोवेळी केलेले बदल पाहू शकता.

‘ट्विटर ब्लू’ सबस्क्रायबर्स असे युजर्स आहेत, जे ट्विटर वापरण्यासाठी पैसे देतात. दरम्यान, आता या नवीन फीचरसाठी युजर्स उत्साही आहेत. शिवाय ट्विटरवर एडिटचा ऑप्शन मिळावा, ही मागणी बऱ्याच काळापासून केली जात होती, त्यामुळे आता जेव्हा ट्विटरने यासंदर्भात घोषणा केली आहे, तेव्हा यावरून पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. काही युजर्स या फिचरचं स्वागत करत आहेत, तर काहींच्या मते ते फक्त ‘ट्विटर ब्लू’ पुरतंच मर्यादित राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *