Chhagan Bhujbal: छगन भुजबळांवर गुन्हा दाखल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१ ऑक्टोबर । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि अन्य दोघांवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूर येथील एका रहिवाशाला मारण्याची धमकी दिल्यानंतर त्या व्यक्तीने चेंबूर येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर IPC सेक्शन 506 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ललितकुमार टेकचंदानी असं तक्रार दिलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी सांगितलं की, भुजबळ यांनी दोन व्हिडिओ शेअर करण्यात आले होते, ज्यामध्ये ते हिंदू धर्माविरोधात बोलत होते. त्यानंतर टेकचंदानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी टेकचंदानी यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केल्यानंतर छगन भुजबळ आणि अन्य दोन व्यक्तींवर गुन्दा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *