Pune CNG Closed Today News ; पुण्यातील तब्बल 60 CNG पंप आज बंद ; कारण…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१ ऑक्टोबर । पुण्यात सीएनजीवर (Pune CNG pump Strike) चालणाऱ्या वाहनांना आज मनस्तापाला सामोरं जावं लागण्याची दाट शक्यता आहे. कारण पुण्यातील तब्बल 60 सीएनजी पंप आज एक दिवसासाठी बंद (Pune CNG Closed Today News) राहणार आहे. या सीएनजी पंपधारकांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. डीएलरच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात न आल्यानं पुण्यातील पंपचालकांनी निषेध म्हणून संप (Pune Strike) पुकारलाय.

पेट्रोल डीलर असोसिएसनच्या वतीने हा एक दिवसाचा संप पुकारण्यात आलाय. त्यामुळे पुण्यातील अन्य सीएनजी पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागून अनेकांचा खोळंबा होण्याची शक्यताय. पुण्यातील टोरेंट सीएनजी स्टेशन आज एक दिवसासाठी बंद राहतील, असा इशारा ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आला होता. डीलर कमिशनमध्ये वाढ करावी, अशी या असोसिएशनची प्रमुख मागणी आहे.

सात दिवस आधीच कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, या मागणीचं पत्र देण्यात आलं होतं. मात्र ही मागणी काही मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे अखेर टोरेंट सीएनजी स्टेशन असलेले सर्व सीएनजी पंप आज एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *