PUC Certificate : वाहनचालकांची ; गाडीला PUCनसेल तर पेट्रोल, डिझेल मिळणार नाही

 76 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१ ऑक्टोबर । No PUC, No Petrol – Diesel : आता गाडीला PUCनसेल तर पेट्रोल, डिझेल मिळणार नाही. तसा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतलाआहे. 25 ऑक्टोबरपासून हा नवा नियम लागू होणार आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी (Pollution under control) केंद्र सरकारचा नवा नियम असणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनो आत्ताच गाडीची PUC काढा.

पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) अनिवार्य करण्यात आले आहे. अन्यथा वाहनचालकांना पेट्रोल आणि डिझेल दिले जाणार नाही. या काळात ज्या वाहनांचे पीयूसी प्रमाणपत्र (PUC Certificate) कालबाह्य झालेले आढळून येईल, ते वाहनचालकांना पंपावरच द्यावे लागणार आहेत. वायू प्रदूषणाला आळा घालण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आता नव्या नियमानुसार प्रत्येक वाहनाची प्रदूषण पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होणार आहे. देशातील सर्व पेट्रोल पंपांवर ही व्यवस्था राहणार आहे. दरम्यान, गाडीला PUCनसेल तर पेट्रोल, डिझेल मिळणार नाही. त्याचवेळी शिक्षा आणि मोठ्या दंडाची तरतुदही असणार आहे.

सरकारने मोटार वाहन कायद्यानुसार (Motor Vehicle Act) नवीन अधिसुचना जारी केली आहे. वाढत्या प्रदुषणाच्या समस्येच्या पार्श्वभुमीवर हे नियम सुरू करण्यात आले आहे. या नव्या अधिसुचनेनुसार वाहनांचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र सोबत असणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच, समजा पीयूसी सोबत (PUC Certificate) नसल्यास वाहनधारकास दंडही होऊ शकतो.

दुचाकी असो वा कार सर्व वाहनांसाठी PUC प्रमाणपत्र (PUC certificate) सक्तीचं करण्यात आले आहे. हे PUC प्रमाणपत्रही वैध असले पाहिजे. प्रमाणपत्राशिवाय किंवा कालबाह्य पीयूसीसह वाहनचालक रस्त्यावर पकडला गेल्यास त्याला दंड होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.