कोरोना; संभाजीनगर रुग्णसंख्या 200 पार; प्रशासनानं घेतला मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – संभाजीनगर – विशेष प्रतिनिधी – आनंद चौधरी – मुंबई, पुणेपाठोपाठ आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगरत कोरोनानं थैमान घातलं आहे. शुक्रवारीही शहरात 39 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासन हादरलं आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 216 वर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शहरातील काही परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत.

शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शहरात ऑड-ईवन (सम-विषम) फॉर्म्युला लागून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यक वस्तू खरेदी करताना नागरिकांची जास्त गर्दी होऊ नये, यासाठी शहरात 3 मेनंतर सम-विषम फॉर्म्युला लागू करण्यात येणार आहे.

सम-विषम फॉर्म्युला

4,6,8,10,12,14,16 मे या सम तारखांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत नागरिक आवश्यक वस्तू खरेदी करू शकतात. तर 3,5,7,9,11,13,15 मे या विषम तारखांना मात्र शहरातील सर्व दुकाने 24 तास बंद राहतील. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. औषधी दुकाने आणि दवाखान्यांना यातून सूट देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *