पुणे, नाशिकनंतर मुंबईचाही नंबर ! सीएनजी, पीएनजीच्या दरात मोठी वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ ऑक्टोबर । मुंबईकरांना (Mumbai CNG Rate Today) दसऱ्याच्या आधी महागाईचा मोठा झटका बसला आहे. सीएनजी (CNG Rates) आणि पीएनजीच्या (PNG Rates) किंमतीत मोठी वाढ करण्यात आलीय. सीएनजीचे दर प्रतिकिलो तब्बल 6 रुपयांनी तर पीएनजीच्या दरात 4 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे घरगुती गॅसची किंमत चार रुपयांनी वाढलीय. ऐन सणासुदीत सामान्य नागरिकांना आता महागाईची झळ बसणार आहे.

 

Horoscope Today दि .४ ऑक्टोबर : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार ; पहा बारा राशींचं भविष्य.

का वाढली किंमत?
मुंबई आणि परिसरामध्ये सीएनजी आणि पीएनजीचे वाढीव दर आजपासून लागू करण्यात आलेत. वाढीव दरांमुळे मुंबईत सीएनजीची किंमती 86 रुपये प्रति किलो झाली आहे. तर पीएनजी गॅससाठी 52.50 रुपये प्रतिकिलो इतका दर आकारला जाणार आहे. 1 ऑक्टोबरपासून नैसर्गिक वायूच्या आयात किंमतीत तब्बल 40 टक्के वाढ झाली आहे. त्याचा परिणाम सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतींवर झालाय.

कुठे किती दर?
सोमवारी पुण्यामधील सीएनजीच्या दरातही 4 रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे पुण्यातील सीएनजीचे दर हे 91 रुपये प्रतिकिलो झाले होते. त्यानंतर आता मुंबईतही सीएनजीच्या दरात मोठी वाढ करण्यात आलीय.

पुण्याच्या तुलनेत मुंबईतील सीएनजीची किंमत 2 रुपये अधिक वाढवण्यात आलीय. मुंबई आणि पुण्यापेक्षाही सीएनजीची किंमत ही नाशिकमध्ये सर्वाधिक आहे. नाशिकमध्ये सीएनजी प्रतिकिलो 95.50 रुपये इतका महाग झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *