महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ ऑक्टोबर । आज नवमी तिथी दुपारी अडीच वाजेपर्यंत राहणार असल्याने पूजा आणि विसर्जनासाठी तीनच मुहूर्त राहतील. परंतु, या तिथीमध्ये दिवसाची सुरुवात झाल्याने संपूर्ण दिवस घरामध्ये कुलदेवी पूजन आणि कन्याभोजनासाठी शुभ राहील. त्याचबरोबर मानस आणि रवि योग तयार झाल्यामुळे संपूर्ण दिवस खरेदीसाठी आणि नवीन सुरुवातीसाठी शुभ राहील.
सूर्योदयाच्या वेळी नवमी तिथी असल्यामुळे या दिवशी स्नान, दान आणि श्राद्ध यांचे पूर्ण फळ मिळेल. आज ग्रह आणि नक्षत्रांपासून मानस आणि रवि योग तयार होत आहेत. या शुभ योगांमध्ये सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातू तसेच नवीन कपडे देखील खरेदी करू शकतात.
महानवमीला महिषासुर मर्दिनीची पूजा
नवरात्रीच्या नवव्या दिवशी महिषासुर मर्दिनीच्या रूपात देवीची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार या तिथीला देवीने महिषासुराचा वध केला होता. यानंतर देवता आणि ऋषींनी देवीची पूजा केली. त्यामुळे नवमीला हवन आणि महापूजेची परंपरा आहे.
महापूजेपासून नऊ दिवसांच्या उपासनेचे फळ
संपूर्ण नवरात्रीमध्ये देवीची पूजा आणि व्रत-उपवास करणे शक्य नसेल झाले तर फक्त नवमीला देवीची उपासना केल्याने नऊ दिवसांच्या देवी उपासनेचे फळ मिळू शकते. मार्कंडेय पुराणानुसार या दिवशी दुर्गा देवीची विशेष पूजा करावी.
कन्या भोजनाचा दिवस
नवरात्रीतील या महापूजेच्या दिवशी कुमारिकांना जेवू घातल्याने देवी उपासनेचे पूर्ण फळ मिळते. ग्रंथानुसार, नऊ दिवस कन्या पूजन आणि भोजन करणे शक्य झाले नसेल तर नवमी तिथीला हे काम अवश्य करावे.