महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑक्टोबर । पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा न्यायालयीन कोठडीत मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे राऊतांचा जेलमध्ये मुक्काम वाढला आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती.
आता 10 ऑक्टोबरलाच याप्रकरणी सुनावणी होणार आहे. आज संजय राऊत यांना कोर्टात आणलं जाणार नाही. राऊत यांचा जामीन अर्ज आणि नियमित सुनावणी एकाचवेळी होणार आहे.