महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑक्टोबर । Moeen Ali, England vs Pakistan: इंग्लंडच्या संघाने १७ वर्षांनंतर पाकिस्तानचा दौरा केला आणि मालिका जिंकत मोठे यशही नोंदवले. इंग्लिश संघाने पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानावर ७ सामन्यांच्या टी२० मालिकेत ४-३ असे पराभूत केले. ३-३ अशी मालिका बरोबरीत असताना शेवटचा सामना रविवारी लाहोरमध्ये खेळला गेला. त्यात इंग्लंडने पाकिस्तानचा धुव्वा उडवत ६७ धावांनी सामना जिंकला. क्रिकेटच्या मैदानावर तर पाकिस्तानी खेळाडूंना टीकेचा सामना करावा लागलाच. पण अखेरचा सामना जिंकून इंग्लंड संघाचे कर्णधारपद भूषवणारा फिरकी अष्टपैलू मोईन अली यानेही पाकिस्तानची जाहीरपणे लाज काढली.
Moeen Ali "food wise. I've been a little bit disappointed in Lahore. Karachi was really nice" #PakvEng #Cricket pic.twitter.com/I8lVa1Xsc1
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) October 2, 2022
मोईन अली काय म्हणाला…
सातव्या सामन्यातील पराभवानंतर म्हणजेच दौरा संपताच इंग्लिश कर्णधार मोईन अली पत्रकार परिषदेत म्हणाला, “संघासाठी केलेली सुरक्षा व्यवस्था अतिशय चांगली होती. आमच्या अपेक्षेपेक्षा आमची चांगली काळजी घेण्यात आली आणि व्यवस्था छान होती. खाण्या-पिण्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर लाहोरमध्ये माझी थोडी निराशा झाली. लाहोरमधील जेवण चांगले नव्हते. त्यापेक्षा कराचीमधले जेवण जास्त बरे होते. तरीही ठीक आहे. साहजिकच हे सर्व खरोखर चांगले झाले, परंतु मला काही गोष्टी थोड्या निराशाजनक आढळल्या.”