कळंब:-तलवारीचा वार करून बार चालकाला लुटले ; सपोनि. कल्याण नेहरकर जखमी,तालुक्यात खळबळ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ ऑक्टोबर । सलमान मुल्ला ; कळंब:- याबाबत सविस्तर माहिती अशी की अश्रूबा कस्पटे हे दि. ५ ऑक्टोबर रोजी त्यांच्या सम्राट बारमध्ये होते. त्यावेळी कन्हेरवाडी येथील नाना भास्कर काळे, हरि भास्कर काळे,कालिदास काळे,राहूल काळे,नाना काळे, अमोल नाना काळे, राजु कालिदास काळे,अश्विन सुभाष काळे यांनी अश्रूबा कस्पटे यांना तलवारीचा धाक दाखवून दारूच्या 8 सिलबंद बाटल्या व रोख 3600 रक्कम लुटून नेली..

अश्रूबा यांनी त्यांना प्रतिकार केला असता त्यांनी कस्पटे यांना लाथाबुक्क्यांनी तर नाना काळे याने उलट्या तलवारीने अश्रुबा यांच्या डोक्यात वार करून त्यांना जखमी केले.

घटनास्थळी कळंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर व पोहे.कॉ दाखल होताच लुटारु चारचाकी वाहनातून पसार झाले.

पोलीस पथकाने अश्रूबा कस्पटे यांना सोबत घेऊन पाठलाग करून आंदोरा शिवारात त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला असता त्यांना दगडफेक करून जखमी केले. याकरणी अश्रुबा कसपटे यांनी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे..

तर भास्कर काळे, हरी मास्कर काळे, कालिदास भास्कर काळे, राहूत नाना काळे, अमोल नाना काळे, राजू कालिदास काळे, आश्विन सुभाष काळे (रा. कन्हेरवाडी ता. कळंब) यांच्याविरुद्ध भादंसं कलम ३९५ ३.२३. ५०४ सह शस्त्र कायदा कलम ४,२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *