राजकीय नाट्याचे डायरेक्शन आणि स्क्रिप्ट रायटिंग, कॅमेरामन भाजपच ; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा आराेप

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ ऑक्टोबर । काँग्रेसने आतापर्यंत एका आरपीआयच्या १० आरपीआय केल्या. भाजपलाही एका शिवसेनेच्या दहा शिवसेना करायच्या आहेत. त्या होऊ द्यायच्या की नाहीत, हे उद्धव ठाकरे यांच्याच हातात आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांना स्पेस न देता त्यांना सर्व निवडणुका लढवाव्या लागतील, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडले. ते अकोल्यात माध्यमांशी बोलत होते. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि शिंदे सेनेच्या दसरा मेळाव्यावर भाष्य करण्याचे टाळत म्हटले की, सध्या सुरू असलेले राजकारण हे महाराष्ट्राची परंपरा नाही. एकनाथ शिंदेंना स्पेस द्यायचा नसेल, तर उद्धव ठाकरेंना पुढच्या सर्वच निवडणुका लढवाव्या लागतील. समझोत्याच्या राजकारणात न अडकता त्यांना हे करावे लागेल. सध्याच्या राजकीय नाट्याचे डायरेक्शन आणि स्क्रिप्ट रायटिंग, कॅमेरामन भाजपच असल्याचे ते म्हणाले. त्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की प्रकाश आंबेडकरांना कोण स्क्रिप्ट लिहून देते हे पाहावे लागेल.

काँग्रेस गैरफायदा घेतेय – याचा गैरफायदा काँग्रेस घेतय हा कालखंड समझोत्याचा आहे. त्याला धरूनच मागच्या लोकसभेतही काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी आपण पाच वेळा अधिक जागा पराभूत झाल्या त्याच जागा आम्हाला द्या. दरम्यान आता शिवसेना आणि भाजपचे भांडण आहे. आम्ही शिवसेनेसोबत यायला तयार आहोत. आम्ही भाजपसोबत जात नाही, याचा गैरफायदा काँग्रेस आणि इतर पक्ष घेताहेत, असेही अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *