टीम इंडियाची वर्ल्डकप मोहिम ; जडेजा,बुमराहनंतर या स्टार खेळाडूला दुखापत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑक्टोबर । येत्या काही दिवसात ऑस्ट्रेलियात आयसीसी टी-२० वर्ल्डकपला सुरूवात होणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट संघाला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वर्ल्डकपच्या आधी स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर पडला. आता टीम इंडियाच्या वर्ल्डकप मोहिमेतील आणखी एक खेळाडूला दुखापत झाली आहे.

भारताचा अतिरिक्त संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात जलद गोलंदाज दीपक चहर खेळू शकला नाही. त्याला दुखापत झाल्याचे वृत्त समोर येत आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार चहरला टी-२० मालिके दरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तो पहिल्या वनडेत खेळू शकला नाही.

दीपक चहर मालिकेतील उर्वरीत दोन सामने खेळू शकणार नाही. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपकला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दीपकची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप कळू शकले नाही. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप संघात दीपक स्टॅडबाय खेळाडू आहे. बुमराहच्या दुखापतीमुळे संघात दीपकची दावेदारी मजबूत समजली जात होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *