कॅन्सरने चिमुकलीचे निधन ; डेव्हिड मिलरवर दुःखाचा डोंगर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ ऑक्टोबर । David Miller Daughter Passes Away : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा फलंदाज डेव्हिड मिलरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डेव्हिड मिलर यांच्या जवळच्या व्यक्तीचा कर्करोगाने निधन झाले आहे. डेव्हिड मिलरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर करून अॅनीला श्रद्धांजली वाहिली आहे.

https://www.instagram.com/davidmillersa12/?utm_source=ig_embed&ig_rid=874ea98b-4a37-4838-a7b1-c729eab32196

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये डेव्हिड मिलर एका मुलीसोबत दिसत आहे. रिपोर्टनुसार मिलरची मुलगी कॅन्सरशी झुंज देत होती. उपचारादरम्यान ती तिच्या सोबत जास्त वेळ घालवताना दिसली. पण मिलर यांनी मुलीच्या आजाराबाबत कोणतेही वक्तव्य किंवा संदेश दिलेला नाही.

डेव्हिड मिलरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, RIP, माझा छोटा रॉकस्टार. मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करीन. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या फोटोंमध्ये मिलरसोबत दक्षिण आफ्रिकेच्या संघाची जर्सी घातलेला दिसत आहे. तसेच काही फोटोंमध्ये तो मुलीला बॉलमध्ये घेऊन जाताना दिसत आहे. तिच्यासोबत खेळतानाही दिसत आहे. काही मीडिया रिपोर्ट नुसार असा दावा केला जात आहे की, ती मुलगी त्याची आहे. जवळच्या मित्राची मुलगी असल्याची पुष्टी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *