महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ ऑक्टोबर । रिक्षा वाल्याकडे इतके पैसे कुठून आले, असा प्रश्न चंद्रकांत खैरेंनी उपस्थित केला आहे.एकनाथ शिंदे साधा रिक्षा वाला माणूस त्याने कुणाच्या नादी लागून शिवसेना फोडली असा प्रश्न उपस्थित केला आहे. आनंद दिघे असते तर शिंदेंना उलट टागले असते, राज्यातून भाजप साफ होणार आहे, तर एकनाथ शिंदेंही कुठे दिसणार नाही, एकनाथ शिंदेंनी आणि गद्दारांनी शिवसेना फोडली अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी दिली आहे, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
काय म्हणाले खैंरे?
शिवसेनेने अनेकांना मोठे केले, ग्रामपंचायत संदस्य ते खासदार बनवले, आणि आता या लोकांनी शिवसेना सोडली, शिवसेना फाडण्याचे पाप या गद्दारांनी केले आहे. जर दिघे आता असते तर त्यांनी शिंदेंना उलट टागले असते असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. दिघे साहेबांच्या नावावर हे सगळं सुरू असले तरी ते वरतून पाहत असतील की बाळासाहेबांची शिवसेना यांनी फोडली असे त्यांना वाटत असेल.
गद्दार कायमचे संपलेच
उद्धव ठाकरेंचा विजय होणारच, ज्यांनी गद्दारी केली ते कायम संपल्याचे लोकांनी पाहिले आहे. एकनाथ शिंदेंना ह धनुष्यबाण मिळणार नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचेे वाटुळे केले असा आरोपही खैरेंनी केला. शिवसेना अशर अनेक संकटातून पुन्हा उभी राहली आहे, लोकांच्या डोळयात यामुळे अश्रू आलेत. मात्र जनता ही ठाकरेंच्या पाठिशी आहे. निवडणूक आयोग केंद्राच्या अधिपत्याखाली काम करत आहे. पंतप्रधानाच्या हातात सर्व आहे, आणि देवेंद्र फडणवीस पंतप्रधानाच्या जवळचे आहे. हा लोकशाहीचा खून आहे असा गंभीर आरोप खैरेंनी केला आहे.