महाराष्ट्र 24 :जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला – याबाबत सविस्तर माहिती अशी की देशाचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासआठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या बद्दल आर.एस.एस. व भाजपाच्या लोकांना चांगले वाटावे म्हणून चुकीचे वक्तव्य करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चुकीचे ठरविण्याचे काम केले होते.
याचाच निषेध म्हणून रिपब्लिकन सेना च्या वतीने आज कळंब उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन पाठवून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला केंद्रीय मंत्री आठवले यांनी आर.एस.एस. व भाजपा बी हुजरेगीरी करावी या बद्दल आमची कसल्याही प्रकारची तक्रार नाही.
परंतु त्यापोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चुकीचे ठरावेण निषेधार्ह व निंदनीय आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेच्या वतीने आम्ही सामुहीक निषेध करत आहोत. जर, केंद्रीय मंत्री आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याची जाहिर माफी मागावी..
अन्यथा उस्मानाबाद जिल्ह्यातील मंत्री महोदयांना जिल्ह्यात प्रवेश करू देणार नाही व प्रवेश केल्यास त्यांना काळे झंडे दाखवून पदरी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात येईल.असे या निवेदनात म्हटले आहे..
या निवेदनावर रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल हजारे,अरुण गरड, राहुल गाडे,विशाल धावारे,इंद्रजित गायकवाड,राजरत्न गाडे,पृथ्वीराज गरड, आदींच्या सह्या आहेत..