Shivsena: माझ्या जीवाला धोका असल्याचे इनपुटस ; पण मी लढलं पाहिजे आणि मी लढणारही : सुषमा अंधारे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ ऑक्टोबर । माझ्या जीवाला धोका असून मी घराबाहेर पडू नये, अशा सूचना मला पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. मात्र, मी शिवसेनेसाठी लढायचे ठरवले आहे आणि मी लढणार. या सगळ्यात मला काही झालं तर मग माझ्या लहान बाळाचं काय होणार, हा प्रश्न आहे. परंतु, माझ्या बाळाची काळजी घ्यायला शिवसेना (Shivsena) पक्ष आहे. प्रत्येक शिवसैनिक हा माझ्या बाळाचा मामा आहे, असे वक्तव्य शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले. त्या गुरुवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

यावेळी सुषमा अंधारे यांनी पोलिसांकडून त्यांना देण्यात आलेल्या सूचनांचा तपशील जाहीर केला. मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठातील शुल्कवाढीविरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले होते. आंदोलन संपल्यानंतर मी मुख्य इमारतीपाशी माझ्या गाडीपर्यंत आले. त्यावेळी माझ्या गाडीत काही पोलीस कर्मचारी बसले होते. त्यांनी मला सांगितले की, ताई आमच्याकडे इनपुटस आहेत, तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यानंतर मी घरी पोहोचले तेव्हा त्याठिकाणी माझ्या सोसायटीच्या खाली दोन पोलीस कॉन्स्टेबल उभे होते. त्यांनी मला सांगितले की, तुम्हाला संरक्षणाची किंवा मदतीची गरज लागली तर आम्हाला सांगा. पण मला वाटतं मी लढलं पाहिजे आणि मी लढणारही आहे. या सगळ्यात मला काही झालं तर माझ्या बाळाचं काय होणार, हा प्रश्न आहे. परंतु, संपूर्ण शिवसेना माझ्या बाळाची काळजी घेईल, हा ठाम विश्वास मला असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले. यासंदर्भात पक्षप्रमुखांशी माझं बोलणं झालं आहे. शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्ते माझ्या पाठिशी ठाम उभे आहेत. आता आम्ही शिवसेनेतर्फे मुंबई पोलीस आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्तांकडे संरक्षणासाठी अर्ज दिल्याचेही सुषमा अंधारे यांनी सांगितले.

२०१८ साली सुषमा अंधारे यांच्यावर ध्यप्रदेशातील इंदूरमधील आपला कार्यक्रम आटोपून परतत असताना हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये सुषमा अंधारे जखमीही झाल्या होत्या. मुंबई आग्रा महामार्गावर इंदूर बायपासवर मृदंग रेस्टॉरंटसमोर असलेल्या पुलालगत हा प्रकार घडला होता. अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली होती. नंबर प्लेट नसलेल्या तीन गाड्या अंधारे यांचा पाठलाग करत होत्या. या गाड्यांपैकी पांढऱ्या व्हॅन वजा गाडीने अंधारे यांच्या गाडीला मागून धडक दिली. यात सुषमा अंधारे यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर इजा झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *