महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे । दि .१८ ऑक्टोबर । पिंपरी चिंचवड शहरातील आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीने आज डॉ.बाबासाहेब आंबडकर स्मारक पिंपरी या ठिकाणी 22 प्रतिज्ञा व राजेंद्रपाल गौतम यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजप सरकार, केजरीवाल सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
सदर आंदोलनात प्रमोद क्षिरसागर, सुरज गायकवाड, विनोद गायकवाड, धर्मराज साळवे, राजन नायर, शिवशंकर उबाळे, रहीमभाई सय्यद, संतोष शिंदे
यांनीही आपली भूमिका मांडली व भाजपा व आम आदमी पार्टीचा निषेध केला..
यावेळी गौतम पटेकर, प्रबुद्ध कांबळे, नरेंद्र सोनटक्के,युवराज भास्कर तिकटे, चंद्रकांत सोनवणे, विकी पासोटे, सतीश कदम, अजय गायकवाड,आदर्श वाघमारे, पंकज हुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. व या आंदोलनाचा शेवट 22 प्रतिज्ञा घेऊन करण्यात आला.