महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ ऑक्टोबर । दिवाळीची शाळेंना सुट्टी लागली आहे. अनेकांनी रस्ता मार्गे गावी जाण्यासाठी घरचा रस्ता पकडला आहे. मात्र, मुंबई – पुणे महार्गावर (Mumbai Pune highway) प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी वाहतुकीबाबत माहिती घेऊन बाहेर पडा. अन्यथा रस्त्याच अडकून पडण्याची शक्यता आहे.
बोरघाट अमृतांजन ब्रीज ते दत्तमंदिरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. बोरघाट टॅबचे महामार्ग वाहतूक पोलीस कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, त्यांना प्रंचड वाहनामुळे ते शक्य होताना दिसत नाही.
मुंबई – गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. तर काही ठिकाणी रस्त्याचे काम रखडलेले दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईहून गोवा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला जाण्यासाठी पुणे व्हाया कोल्हापूरचा पर्याय वाहन चालक निवडत असतात. त्यातच दिवाळीसाठी घरी जाणाऱ्यांची लगबग सुरु आहे. सलग सुट्टी असल्याने अनेकांनी गावी जाण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मुंबई – पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.