महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ ऑक्टोबर । गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत होती. दिवाळीच्या तोंडावर तर सोने चांदीचे दर महागल्याचेही दिसून आले. आजपासून दिवाळीला शुभारंभ होत आहे त्यामुळे सोने चांदीच्या दरात तेजी अपेक्षित आहे. अशात ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसला सोने चांदीचे दर घसरले आहे.
आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,350 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,560 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 561 रुपये आहे. (gold silver price update 21 october 2022)
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.
मुंबई – 50,560 रुपये
नागपूर – 50,590 रुपये
पुणे – 50,590 रुपये
चेन्नई – 51,110 रुपये
दिल्ली – 50,730 रुपये
हैदराबाद – 50,560 रुपये
कोलकत्ता – 50,730 रुपये
लखनऊ – 50,950 रुपये