नवे घर बांधण्याची योग्य वेळ ; दिवाळीपूर्वी लोखंडी सळ्यांच्या किंमती घसरल्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ ऑक्टोबर । गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम सर्व वस्तुंवर झाला. सध्याच्या घडीला घर बांधणही महाग झाले. सिमेंट, वाळू, स्टील (Steel) या सर्व वस्तुंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या. पण सध्या घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळीपूर्वीच स्टीलच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.

त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर (Home) बनवण्यासाठी खर्च कमी होणार आहे.स्टीलच्या किमतीत सातत्याने घट होत आहे. गेल्या सहा महिन्यात ४० टक्क्यांनी किमती कमी झाल्या आहेत. सध्या स्टील ५७,००० रुपये प्रति टन असा आहे.

याचा सर्वात मोठा परिणाम रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रात दिसून येणार आहे. स्टील महाग झाले की बांधकामाचा खर्च वाढतो आणि स्वस्त झाला की तुमच्या खिशाचा भार कमी होतो. त्यामुळे आता घर बांधण्याची ही मोठी संधी आहे.

 

ब्रिटनमध्ये राजकीय उलथापालथ पण ऋषी सुनक कुठेयत? 15 दिवसांपासून गायब, ट्विटही सव्वा महिन्यापूर्वीचे

एप्रिल २०२२ च्या सुरुवातीला देशांतर्गत बाजारात स्टीलच्या किमती ७८,८०० रुपये प्रति टन वर पोहोचल्या होत्या. त्यावर १८ टक्के जीएसटी लावल्यास त्याचा दर सुमारे ९३,००० रुपये प्रति टन होतो.

दिवाळीपूर्वी स्टीलच्या (Steel) किमतीत मोठी घसरण झाली आहे. सध्या स्टीलची किंमत ५७,००० रुपये प्रति टनावर आली आहे. एप्रिलच्या अखेरीस स्टीलच्या किमती घसरण्यास सुरुवात झाली. अवघ्या दोन महिन्यांत त्याची किंमत जूनअखेर ६०,२०० रुपये प्रति टनावर आली होती.

देशातील स्टीलच्या किमती

हैदराबादमध्ये ५०,००० रुपये प्रति टन अशी किमत सध्या सुरू आहे. तर राजस्थानमध्ये ५३,१०० रुपये/टन, मध्यप्रदेश ५४, २०० रुपये प्रति टन, दिल्लीत ५३, ३०० रुपये, महाराष्ट्र ५५,१०० रुपये, उत्तर प्रदेश ५५,२०० रुपये, छत्तीसगड ५०,००० रुपये प्रति टन अशा स्टीलच्या किमती आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *