Vasubaras Diwali 2022 : नाशिकच्या गोशाळांमध्ये 2500 हून अधिक गाय वासरांचे पूजन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ ऑक्टोबर । दीपोत्सव अर्थ दिवाळीला (Diwali) खऱ्या अर्थाने शुक्रवारी वसुबारसेनी (Vasubaras) प्रारंभ झाला असून भारतात भारतीय संस्कृतीत गायीला विशेष महत्त्व असल्याने नाशिक (Nashik) शहरात सात गोशाळामध्ये (Goshala) जवळपास 2500 हून अधिक गाय वासरांचे पूजन करण्यात येणार असून मोठ्या उत्साहात वसुबारस साजरी करण्यात येणार आहे. दोन वर्षानंतर निर्बंध मुक्त दिवाळी होत असल्याने गोशाळेमध्ये कीर्तन, गो पूजनाचे महाप्रसादेचे ही आयोजन यंदा करण्यात आले आहे. दीपोत्सवाला आज प्रारंभ झाल्याने उत्साहाचे वातावरण आहे,.

आज दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस (Vasubaras). कोरोना (Corona) संकटाच्या दोन वर्षाच्या कठीण काळानंतर यंदा मात्र, दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे. यावर्षी दिवळी सण साजरा करण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. दिवाळीला सणांचा राजा म्हटलं जातं. अंधाराकडून प्रकाशाकडे, दु:खाकडून आनंदाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. वसुबारसपासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते. या दिवशी गाई वासराचे मनोभावे पूजन केले जाते. नाशिक शहरात असंख्य गोशाळा असून या ठिकाणी दरवर्षी मोठा सोहळा आयोजित केला जातो. आज दोन वर्षानंतर हा सोहळा नाशिककरांना अनुभवयास मिळणार आहे.

दिवाळीची सुरुवात वसुबारसने होते. गाई वासरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. वसू म्हणजे द्रव्य अर्थ धन त्यासाठी असलेली बारस. याच पार्श्वभूमीवर वसुबारस निमित्त नाशिक शहरातील गोशाळांमध्ये आज सायंकाळी वसुबारसचे पूजन होत असून या गोसेवेमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. नाशिक शहरातील सर्व गौशाळांमध्ये सकाळी 11 ते सायंकाळी पर्यंत पूजन करण्यात येणार आहे. नाशिक शहरातील मंगल रूप गोशाळा, कृषी गोसेवा ट्रस्ट, नंदिनी गोशाळा, धर्मचक्र प्रभावतीर्थ गोशाळा, बालाजी गोशाळा, पांजरपोळ, श्रीकृष्ण गोशाळा या गोशाळांमध्ये जवळपास 3000 हून अधिक गाई असून त्यांचे पूजन आज केले जाणार आहे

कोरोनाची दोन वर्ष गोशाळेत सध्या पद्धतीने वसुबारस साजरी करण्यात आली. मात्र यंदा मोठा उत्साह आहे. त्या पार्श्वभूमीवर गे पूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. वसुबारस निमित्त गोशाळेत भाविकांकडून गाय वासराचे पूजन केले जाणार आहे. सगळ्यात जवळपास पाचशेहून अधिक भाविक सहभागी होणार आहेत. या दृष्टीने नियोजन करण्यात आले असल्याचे मंगलरूप गो शाळेचे संचालक पुरुषोत्तम आव्हाड यांनी सांगितले.

वसुबारसच्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गायीला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरु असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *