महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ ऑक्टोबर । दिवाळीमुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढतेय. अशात एसटीने भाडेवाढ केली आहे. 5-75 रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे.त्यामुळे तुम्ही एसटीने प्रवास करणार असाल तर तुम्हाला अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. 31 ऑक्टोबरपर्यंत ही भाडेवाढ लागू असेल. दरवर्षी दिवाळीत ही भाडेवाढ करण्यात येते. दिवाळीच्या दिवसांमध्ये लोक एसटीने प्रवास करत असतात. यातून एसटी महामंडळाला अधिकचा महसूल मिळावा, म्हणून ही भाडेवाढ दरवर्षी करण्यात येते.