![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ ऑक्टोबर । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेगा भरती मोहिमेची सुरुवात करणार आहेत. त्यात जवळपास 75 हजार तरुणांना नियुक्ती पत्र सोपवण्यात येणार आहेत. यावेळी मोदी तरुणांशी आभासी संवादही साधतील. या योजनेंतर्गत पुढील दीड वर्षांत म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत 10 लाख तरुणांना नोकरी देण्याचे लक्ष्य आहे.
ह्या भरत्या केंद्र सरकारच्या 38 मंत्राल व विभागांत होतील. त्या UPSC, SSC, रेल्वे भरती बोर्ड (RRB) व अन्य केंद्रीय यंत्रणांमार्फत होणार आहेत. पंतप्रधानांनी हा निर्णय गत जून महिन्यात मंत्रालयांच्या मॅन पॉवरचा आढावा घेतल्यानंतर घेतला होता.
येथून येणार 10 लाख नोकऱ्या
सद्यस्थितीत ग्रुप ए (गॅझेटेड) कॅटेगरीत 23584, ग्रुप बी (गॅझेटेड) कॅटेगरीत 26282, तर ग्रुप सी च्या नॉन गॅझेटेड कॅटेगरीत 8.36 लाख पोस्ट रिक्त आहेत. एकट्या संरक्षण मंत्रालयात ग्रुप बीचे (नॉन गॅझेटेड) 39366 व ग्रुप सी ची 2.14 लाख पदे रिक्त आहेत. रेल्वेतील ग्रुप सीची 2.91 लाख व गृह मंत्रालयातील ग्रुप सी नॉन गॅझेटेड कॅटेगरी अंतर्गत 1.21 लाख पदे रिक्त आहेत.
पीएम मोदी या भरती मोहिमेंतर्गत संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, डाक विभाग, गृह मंत्रालय, कामगार व रोजगार मंत्रालय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI) , सीमा शुल्क व बैंकिंग, सशस्त्र बल कर्मचारी, सब-इंस्पेक्टर, कॉन्स्टेबल, LDC, स्टेनो, PA व प्राप्तिकर निरीक्षकांसह 38 विभागांत देशभरातून निवडण्यात आलेल्या तरुणांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत.
केंद्रीय मंत्री अनेक शहरांतून सहभागी
या कार्यक्रमात देशभरातील अनेक शहरांतून केंद्रीय मंत्री सहभागी होतील. ओडिशातून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, गुजरातमधून आरोग्य मंत्री मनसूध मांडविया, चंदीगडमधून माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, महाराष्ट्रातून वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, राजस्थानातून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, तामिळनाडूतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन, उत्तर प्रदेशातून उद्योग मंत्री महेंद्र पांडे सहभागी होणार आहेत. तर झारखंडमधून आदिवासी प्रकरणांचे मंत्री अर्जुन मुंडा व बिहारमधून पंचायत राज मंत्री गिरिराज सिंह सहभागी होणार आहेत.
2020 पर्यंत 8.72 लाख जागा रिक्त होत्या
केंद्र सरकारमध्ये 1 मार्च 2020 पर्यंत तब्बल 8.72 जागा रिक्त असल्याची माहिती गतवर्षी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली होती. केंद्र सरकारच्या विविध विभागांत एकूण 40 लाख 4 हजार पदे आहेत. यातील 31 लाख 32 हजार जागा भरल्या आहेत. 2016-17 पासून 2020-21 पर्यंत SSC मध्ये एकूण 2 लाख 14 हजार 601 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. तसेच RRB ने 2 लाख 4 हजार 945 जणांची भरती केली. UPSC नेही 25 हजार 267 उमेदवारांची निवड केली.