महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ ऑक्टोबर । आज दिवाळीनिमित्त सगळीकडे जल्लोष सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. तर ते आज सकाळीच कारगीलमध्ये दाखल झाले आहेत. त्याचबरोबर आज दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्वीट करत देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. हा पवित्र सण आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा भाव घेऊन येवो, अशा शुभेच्छा मोदींनी दिल्या आहेत.
दुसरीकडे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी शुभेच्छा देता म्हटले आहे की, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! तेजस्वी प्रकाशाचा हा सण आपल्या जीवनात बुद्धी, मंगल आणि समृद्धी घेऊन येवो. झगमगत्या दिव्यांची आभा आपल्या देशाला आशा, आनंद, आरोग्य आणि समरसतेने उजळून टाकू दे अशी आशा धनखड यांनी व्यक्त केली आहे.