ऐन दिवाळीत राज्यात मोठा अपघात, एका पाठोपाठ रेल्वेचे २० डबे रूळावरून घसरले; ६ गाड्या रद्द

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ ऑक्टोबर । ऐन दिवाळीच्या दिवशी अमरावती नजीक मालखेड टिमटाला दरम्यान रेल्वे अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. रात्री उशिरा टीमटाला ते मालखेड रेल्वे मार्गावर मालगाडी घसरली आहे. मालगाडीचे २० डब्बे रुळावरून घसरले आहे. सुदैवाने या दुर्घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

या संदर्भात रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री रात्री उशिरा टीमटाला ते मालखेड दरम्यान मुख्य रेल्वे मार्गावर मालगाडीचे १५-२० डबे घसरले. कोळसा घेऊन जाणारी ही मालगाडी इंजनसह रुळावरून घसरली. रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे मोठा आवाज झाला. एकापाठोपाठ रेल्वेचे २० डबे रुळावरून खाली घसरले. मालगाडीचे इंजिन हे रुळाच्या बाजूला कोसळले. तर काही डबे हे रुळावर आडवे झाले. त्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. नागपूर, मुंबई जाणारी वाहतूक नरखेड मार्गे वळवण्यात आली आहे.

रेल्वे डबे रुळावरून बाजूला करण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत तर अनेक गाड्या नरखेड मार्गे वळवण्यात आल्या आहे. रेल्वेच्या नागपूर डिव्हिजनमध्ये ही घटना घडली आहे. घटनास्थळी रेल्वेचे कर्मचारी पोहोचले असून युद्धपातळीवर रेल्वे रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे आज नागपूर मुंबई रेल्वे मार्गावरील सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *