महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ ऑक्टोबर । राज्यासह देशभरात परतीच्या पावसाचा काळ दिवाळीपर्यंत चालू राहिला. दिवाळी सुरू झाल्यानंतर 2 दिवसांनी पावसाने राज्यातून काढता पाय घेतला आहे. पाऊस जाऊन दोन दिवसही झाले नसतानाच पुणे शहरासह परिसरात गुलाबी थंडी पडू लागली आहे.
मान्सून जाताच पुणेकरांना थंडी अनुभवायला मिळाली आहे. मान्सून परतताच शहरातील तापमान ७ ते ८ डिग्रीने घटले आहे. पुण्यात काल रात्रीपासून अचानक थंडी जाणवू लागली आहे. आज पुण्यात १४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर शिवाजीनगर परिसर १४.४, लोहगाव १५.८, चिंचवड १७.७, लवळे १७.८, मगरपट्टा १८.५ तापमानची नोंद झाली आहे.
यावर्षी परतीचा पाऊस खूप वेळ चालला. दिवाळीच्या तोंडावर पुण्यासह परिसरात पावसाने हाहाकार माजवला होता. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर दिसून आला. दरम्यान, मराठवाड्यामध्ये झालेल्या पावसाने शेतात काढून ठेवलेली सोयाबीन आणि इतर पिके वाहून गेली.