महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ ऑक्टोबर । टी-20 विश्वचषकात पाकला अस्मान दाखवून टीम इंडियाने समस्त भारतीयांना दिवाळीची अविस्मरणीय भेट दिली. भारतीय संघाने रविवारी मेलबर्नमध्ये पाकचा 4 गडी राखून दारूण पराभव केला. या रोमांचक विजयाचा हीरो विराट कोहली ठरला. त्याचा प्लेअर ऑफ द मॅचने सन्मान करण्यात आला.
या सामन्यात सर्वकाही ठिकठाक होते असे नाही. त्यात खूप वाद झाले. सर्वात मोठा वाद शेवटच्या षटकात पंचांनी घोषित केलेल्या एका नो बॉलवर झाला. पाकिस्तानी चाहत्यांनी अंपायरच्या या निर्णयावर आक्षेप घेतला. त्यांच्या मते, हा बॉल कंबरेखाली होता, त्यानंतरही तो बाद ठरवण्यात आला.
शोएब अख्तरचे प्रश्नचिन्ह
टीका करणाऱ्यांत पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा समावेश आहे. तो कोहलीचा एक फोटो शेअर करत म्हणाला – ‘हा एक चांगला चेंडू होता. पण पंचांनी तो नो बॉल ठरवला. अंपायर भावांनो, आज रात्री विचार-विनिमय करण्यासाठी तुम्हाला जेवण.’ शोएब अख्तरच्या या ट्विटवर एका भारतीय युजरने हा नो बॉलच असल्याचे जोरदार प्रत्युत्तर दिले. त्याने यासंबंधीचा एक फोटोही ट्विट केला.
रमीज राजा म्हणाला – संपूर्ण सामनाच वादग्रस्त
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीज राजा यांनीही या प्रकरणी टीका केली आहे. आपल्या ट्विटमद्ये त्यांनी कुणाचा उल्लेख केला नाही. पण त्यांनी हा मॅच फेअर नसल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले – ‘एक क्लासिक मॅच. तुम्ही काही जिंकता, तसे काही हरता. ही मॅच क्रूर व अयोग्य ठरू शकते हे तुम्हाला ठावूक आहे. पाकिस्तानी संघ बॉल व बॅटने याहून चांगली कामगिरी करू शकला नसता. या एफर्टसाठी गर्व वाटतो.’
अखेरीस काय घडले होते शेवटच्या षटकात?
भारतीय संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज होती. तेव्हा पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने स्पिनर मोहम्मद नवाजच्या हातात चेंडू सोपवला. अंपायरने या षटकातील चौथा चेंडू नो बॉल घोषित केला. त्यावर मोठा वाद झाला. या बॉलवर कोहलीने लेग साइडला षटकार खेचला होता. या ओव्हरमध्ये पाकला 2 बळीही मिळाले. पण नो बॉलने त्यांचे गणित बिघडवले. विराट कोहलीने मॅच विनिंग खेळी केली.