बिर्याणी खाल्ल्याने खरच पौरुषत्वावर परिणाम होतो का? राजकीय नेत्याच्या अजब विधानाची चर्चा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ ऑक्टोबर । बिर्याणी (Biryani) खाल्याने पौरुषत्वावर परिणाम होतो, अशा आरोपानंतर एका राजकीय नेत्याने बिर्याणीची दोन दुकानं बंद केली. पश्चिम बंगालमधली (West Bengal) ही अजब घटना आहे. कूचबिहार (cooch behar) अध्यक्ष आणि तृणमूल काँग्रेसचे नेते रबिंद्रनाथ घोष (Ravindranath Ghosh) यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक लोकांनी याबाबत तक्रार केल्या होत्या. वाढत्या तक्रारीची दखल दखल रबिंद्रनाथ घोष यांनी कूचबिहार परिसरातील या दुकानांची पाहणी केली. या दुकानदारांकडे अधिकृत परवानाही नसल्याचं या कारवाईत आढळलं.

स्थानिक लोकांच्या तक्रारी
कूचबिहार परिसरातील दोन दुकानांमधली बिर्याणी खाल्याने पौरुषत्वावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी स्थानिक लोकांनी केल्या होत्या. बिर्याणीसाठी या दुकानात जो मसाला वापरला जात होता त्यामुळे हा परिणाम होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं होतं. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून बिहार आणि उत्तर प्रदेशमधून काही जणं पश्चिम बंगालमध्ये येऊन बिर्याणीची विक्री करत होते. त्यांच्याविरोधात तक्रारी वाढत गेल्या होत्या.

या तक्रारीची दखल घेत रबिंद्रनाथ घोष यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दुकानांवर कारवाई केली. त्यांच्याकडे कोणताी अधिकृत सरकारी परवाणा नव्हता. जी दुकानं बंद करण्यात आली आहेत, त्यांच्या मालकांकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. याआधीही अशा काही घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *