महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ ऑक्टोबर । टी२० विश्वचषकात (T20 World Cup) रविवारी झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानी टीमला (Ind Vs Pak) पराभवाची धूळ चारली. मेलबर्नच्या ग्राउंडवर तब्बल ९० हजार प्रेक्षकांच्या साक्षीने खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने ४ गडी राखून पाकिस्तानवर विजय मिळवला. भारताच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो विराट कोहली (Virat Kohli). विराटने खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा दाखवून दिलं की किंग कोण आहे. विराटच्या या तुफानी खेळीमुळे त्याच्यावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विराटचं हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच त्यातून पाच धडे घ्यावेत, असं एका आयएएस अधिकाऱ्याने सुचवलं आहे.
रविवारच्या सामन्यातील कोहलीची तुफान फटकेबाजी नेत्रदीपक होती. विराटने आपला अनुभव यावेळी कामी आणला आणि त्यामुळेच भारताला विजय मिळवता आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विराटच या सामन्याच्या मॅचविनर ठरला. विराटने ५३ चेंडूत ८२ धावा खेचत भारताला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात कोहलीने लगावलेला षटकार भारतासाठी मॅचविनिंग ठरला. शेवटच्या चेंडूवर अश्विनसोबत एक धाव काढत संघाने विजयाची फटाके फोडले.
#ViratKohli𓃵 की पारी से सीख:
1. आपका बुरा समय भी स्थायी नहीं है
2. सिर्फ़ अपने परफ़ॉर्मेंस से ही जवाब दिया जा सकता
3. अंतिम समय तक अपनी भावनाओं पर नियंत्रण रखना
4. लोगों की याददाश्त बहुत छोटी होती है
5. जब आत्मविश्वास बढ़ता है तो कठिन परिस्थिति भी आसान लगती है— Awanish Sharan (@AwanishSharan) October 24, 2022
विराटच्या खेळीतून कोणते पाच धडे घ्यावेत?
१. तुमची वाईट वेळही निघून जाते
२. केवळ तुमच्या कामातूनच (परफॉर्मन्स) टीकेला उत्तर दिलं जाऊ शकतं
३. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला हवे
४. लोकांची स्मरणशक्ती अत्यंत अल्प असते
५. आत्मविश्वास वाढला की कठीण परिस्थितीही सुलभ वाटते
दरम्यान, सामना जिंकल्यानंतर कोहलीने हेल्मेट काढत आकाशाकडे बघितले आणि डोळे घट्ट मिटून घेतले होते. यावेळी त्याच्या डोळ्यात हलकेच अश्रू दाटून आले होते. “हे खरोखरंच अविश्वसनीय आहे, माझ्याकडे शब्द नाहीत, हे कसं घडलं याची कल्पनाही नाही. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत. शेवटपर्यंत आपण टिकून राहिलो तर आपण लक्ष्य पूर्ण करू शकतो, असा विश्वास हार्दिकला होता. हॅरिस हा त्यांचा प्रमुख गोलंदाज आहे आणि मी ते दोन षटकार मारले. हिशोब साधा होता. नवाजला एक षटक टाकायचे होते, त्यामुळे मी हॅरिसला जर शॉट्स मारले तर ते घाबरतील” असं या विजयानंतर कोहली म्हणाला होता.