महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ ऑक्टोबर । एकनाथ शिंदे सरकारमधील दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. यावेळी राज्यमंत्रीही शपथ घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळं आता या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळतेय हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Maha Cabinet will soon be expanded Minister of State will also take oath Info gives by Devendra Fadnavis)
आत्तापर्यंत राज्यात फक्त कॅबिनेट मंत्र्यांचाच शपथविधी झाला आहे. राज्यमंत्री म्हणून कोणीही शपथ घेतली नव्हती, त्यामुळं पुढच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल हे पाहाणं औत्सुक्याचं असणार आहे. पण हा मंत्रिमंडळ विस्तार नक्की कधी होईल याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होईल अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंच्या गटाला अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिंदेंचं सरकार स्थापन होताच यामध्ये पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला संधी मिळेल अशी आशा बच्चू कडू यांना होती. पण तसं घडलं नाही, त्यामुळं त्यांनी अनेकदा जाहीररित्या नाराजीही व्यक्त केली होती. पण आपल्याला मंत्रिपद नक्कीच मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळं पुढच्या मंत्रिमंडळात बच्चू कडूंना संधी मिळतेय का हे पहाणं औत्सुक्याच ठरणार आहे.